Share

‘हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय ? हे बाहेर यायला हवं’

Published On: 

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू मागील गूढ वाढत आहे. हिरेन यांच्या पत्नीने शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील उमटले होते. सचिन वाझे यांच्या विरोधात सबळ पुरावे असून त्यांना निलंबित करून अटक करावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र, सचिन वाझे यांची क्राईम ब्रांच मधून बदली करण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.

आज या प्रकरणावर भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय आहे ते बाहेर यायला हवं,’ असं विधान केलं आहे. ‘मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून द्यायचा असेल तर सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. अँटिलियाच्या बाहेर नेमकं काय झालं, हे जर आपल्याला खरंच जाणून घ्यायचं असेल तर सचिन वाझेंची चौकशी आणि अटक झालीच पाहिजे. हे नेमकं अतिरेकी प्रकरण आहे की खंडणीचा विषय ? हे बाहेर यायला हवं’ असं वक्तव्य करून त्यांनी आणखी एका विषयाला फाटा फोडून दिला आहे.

गोंधळ सुरूच : सचिन वाझेंची एकदा नाही तर दोनदा बदली !

सचिन वाझे यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!