बुलढाणा- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः राज्यात महिला सुरक्षित आहेत कि नाही असे विचारण्याची वेळ आली आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,वनमंत्री संजय राठोड,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपने या मुद्द्यावरून सरकारला घेरले आहे.राठोड यांनी राजीनामा दिला असला तरीही रोज घडणाऱ्या घडामोडी या जनतेला ठाकरे सरकारबद्दल असणारा आदर कमी करत असल्याचे दिसून येत आहे.यातच काल मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडल्याने देखील एकच खळबळ उडाली आहे. राज्यात घडणाऱ्या या घडामोडींवर आता भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांनी मार्मिक भाष्य केले आहे.
पूजा चव्हाणने आत्महत्या केली,
हिरेन मनसुखने आत्महत्या केली,
जळगावच्या त्या महिलेने गर्मी लागत होती म्हणून झगा काढून ठेवला होता
ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे,
मुंडे,शेख,वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि
राज्याला धोका सचिन,लतादीदी,अमिताभ, अक्षय कडून आहे. pic.twitter.com/HbfgBkTGM9— Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) March 6, 2021
पूजा चव्हाणने आत्महत्या केली, मनसुख हिरेनने आत्महत्या केली, जळगावच्या त्या महिलेने गर्मी लागत होती म्हणून झगा काढून ठेवला. ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे. पण सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे मेहबूब शेख, वाघमारे, संजय राठोड अगदी निरागस आहे म्हणत राज्याला धोका मात्र सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्याकडून असं म्हणत आमदार महाले यांनी ठाकरे सरकारवर मर्मभेदी बाण सोडला आहे.
कृषी आंदोलनच्या मुद्यावरून भारतातील वातावरण बिघडवण्यासाठी परदेशातून एक मोहीम चालवली जात असताना भारतरत्न सचिन तेंडूलकर,लता मंगेशकर ,अमिताभ-अक्षय यांनी देशाच्या अखंडतेबाबत भाष्य करत एकतेचा संदेश दिला होता. अशा वेळी ठाकरे सरकारने घेतलेल्या चौकशीच्या मुद्द्यावरून महाले यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजप-मनसे युती होणार ?, गिरीश महाजन यांची मोठी प्रतिक्रिया
- मुख्यमंत्र्यांनी राज्यात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी: नारायण राणे
- मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालातून महत्वाची माहिती उघड
- अमेझॉननंतर आता या कंपनीने देखील सादर केली सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड
- नवी मुंबईतील मतदार यादीत प्रचंड घोळ; 20 हजार हरकतींची सूनावणी घेण्याची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

