Share

नवी मुंबईतील मतदार यादीत प्रचंड घोळ; 20 हजार हरकतींची सूनावणी घेण्याची मागणी

Published On: 

मुंबई- नवी मुंबई महानगरपालिका नवीन मतदार नोंदणी बनवण्याचं काम अशा पद्धतीने झालं आहे की, त्याच्यावर एक सिनेमा बनेल. केवळ भारतीय जनता पक्षाने 20,000 हरकती नोंदवल्या असून त्यावर सुनावणी घ्या अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली.

कोरोनाचे कारण देत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणूका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला काल सरकारने विधानसभेची परवानगी घेतली. त्याला विरोध करताना आमदार आशिष शेलार यांनी कोरोना आणि मान्सून पूर्व तयारीची कामांमध्ये लोकप्रतिनिधींनींंचे महत्त्व लक्षात घेऊन प्रशासकाला किती काळ अमर्याद अधिकार द्यायचे हे पण ठरवावे लागेल, असा सवाल त्यांनी केला.

नवी मुंबईतील मतदार यादीत प्रचंड घोळ असून 20 हजार हरकती भाजपाने नोंदवल्या आहेत. त्याबाबत तातडीने सुनावणी घ्या. प्रत्येक केसची सुनावणी घ्या अशी आग्रही मागणी त्यांनी केल्या. ज्यावेळी सरकार निवडणूका पुढे ढकलण्याची परवानगी मागते आहे तेव्हा, एका वाक्यात सांगा झाला तर अमर्याद अधिकार राज्य सरकारकडे येण्याच्या या निर्णयाला भाजपाचा विरोध आहे. असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!