Share

राजकीय गोटात खळबळ : आघाडीत बिघाडी ? शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये गुप्त बैठक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीगाठींचे सत्र सध्या अधिक वाढले आहे.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काही विसंवाद निर्माण झाला असून संजय राऊत हे मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेत असल्याच बोललं जात आहे. आधीच, पदोन्नती आरक्षण, मंत्र्यांमधील श्रेयवाद, काँग्रेसला मिळणारी दुय्यम वागणूक, निधी वाटप, स्वबळाचा नारा आदी मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

महाविकास आघडीतील नेते वारंवार हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं सांगत असले तरी भाजपने मात्र सरकारची कोंडी करण्याचा कोणताही मुद्दा सोडलेला नाही. अशातच एका खाजगी वृत्तवाहिनीने मंगळवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिलं आहे. यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे जरी गुपित असलं तरी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाल्यानंतर ही बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे.

या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते. तर, राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे हे नेते उपस्थित होते. महाविकास आघाडीमध्ये कोणताही अंतर्गत वाद जास्त उफाळून सरकारला त्याची इजा पोहोचू नये यासाठी संजय राऊत हे गेले काही दिवस ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. सध्या अनेक तर्क लावले जात असले तरी याबाबत उपस्थित नेत्यांपैकी कोणीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे ही बैठक नेमकी कषाबाबत झाली याबाबत फक्त शक्यताच वर्तवण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!