Share

‘महागाईचा आजार, जनता बेजार…सुखाने आहे फक्त मोदी सरकार’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वसामान्यांना जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला आहे, कारण एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. आधीच पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला कात्री बसलेली असतानाच आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढवल्या आहेत.

तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडर आणि कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर तब्बल २५. ५० रुपयांनी महागला आहे. तर कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत ८४ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी घरगुती आणि कमर्शियल दोन्ही गॅस सिलेंडरचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबईत घरगुती सिलेंडरची किंमत ८३४.५० रुपये इतकी झाली आहे.

यावर काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘माहगाई चा आजार, जनता बेजार… सुखाने आहे फक्त मोदी सरकार,’ असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. इतर काँग्रेस नेत्यांनी देखील मोदी सरकारवर हल्ल्याबोळ केला असून दिवसेंदिवस देशात इंधनांच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे सामान्य जनता अधिक त्रस्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!