मुंबई : इंग्लंड दौऱ्यावरील डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना गमावल्यानंतर भारतीय संघ 20 दिवसाच्या सुटीवर आहे. ही सुटी संपल्यानंतर भारतीय संघ हा इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर युवा फलंदाज शुभमन गील हा जायबंदी झाला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला तो मुकु शकतो. ही मालिका सुरु होण्यास अद्याप एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. शुभमन गीलच्या दुखापतीबद्दल अधिक माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुखापत जास्त गंभीर नसल्याने तो मायदेशी न परतता इंग्लंडमध्येच संघासोबत राहणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो काही सामन्यासाठी उपलब्ध होईल अशी आशा संघ व्यवस्थापन व्यक्त करत आहे. गीलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगीरी केल्यामुळे तो संघाचा नियमीत सलामीवीर बनला होता. गाबा कसोटी सामन्यात त्याने चौथ्या डावात 91 धावांची झुंजार खेळी केली होती. मात्र यानंतर इंग्लंडविरुद्ध भारतात पार पडलेल्या मालिकेत गील अपयशी ठरला. तरी त्याला डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सलामीला खेळवण्यची जोखीम विराटने घेतली येथेपण तो अपयशी ठरला.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्यास मोदी आपल्या सहकाऱ्यांना का सांगत आहेत ?
- रोहित शर्माने लोणावळ्यातील बंगला विकला अशोक सराफांच्या कुटुंबीयांना ; किंमत तब्बल ५.२५ कोटी
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
- करीनाला सिनेइंडस्ट्रीत २१ वर्षे पुर्ण; शेअर केली पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

