मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना ईडीने जोरदार दणका दिला आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ईडीच्या या कारवाईनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला.
आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!
— Narayan Rane (@MeNarayanRane) March 22, 2022
नारायण राणे म्हणाले, ‘आगे आगे देखिए होता है क्या! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या! आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!’ असं ट्वीट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या –


