मुंबई: ईडीने पुष्पक ग्रुपच्या (ED action taken against Pushpak Group) ६ कोटी ४५ लाख रुपयांच्या मालमत्तेची चौकशी केली आहे. त्यात रश्मी ठाकरे यांचे सख्खे भाऊ तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या ठाण्यातील नीलंबरी प्रकल्पातील ११ सदनिकांना टाळे ठोकण्यात आले आहे. यावर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. यावरच आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी नंदकिशोर चतुर्वैदी आणि ठाकरे कुटुंबाचे संबंध काय, असा सवाल केला आहे.
श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारामुळे त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता आहे. ईडीला एका व्यवहाराची माहिती दिली असून ३० कोटींचा गैरव्यवहार झाला. मी ईडीला गेल्या दीड वर्षात कोट्यवधींची माहिती दिली असून सर्व गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार. असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
तसेच मुख्यमंत्री परिवाराला माझी विनंती आहे की जे आर्थिक व्यवहार आहेत, शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लाँड्रिंग केलं त्यासंबंधी तुम्ही माहिती देणार की मलाच द्यावी लागणार? आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी २०१४ मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी बनवली होती त्याचे आदित्य ठाकरे मालक पण आहे आणि संचालक पण आहेत. ५० टक्के त्यांचे आणि ५० टक्के रश्मी ठाकरेंचे आहे. मात्र या कंपनीची मालकी आता नंदकिशोर चतुर्वैदी यांची आहे. हा हवाला ऑपरेटर असून ३० कोटींच्या व्यवहारात त्यांचा समावेश आहे. ठाकरे परिवाराने जी कंपनी बनवली होती ती नंदकिशोर चतुर्वेदींना का दिली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भाजप सुडाचे राजकारण करतेय; ‘त्या’ कारवाईनंतर अनिल देसाईंचा आरोप
- IPL 2022 : भावांनो आयपीएल सामन्यांची तिकीटं हवीत का? तर वाचा ही महत्त्वाची बातमी!
- IPL 2022 : गोलंदाजांनो सावधान..! आंद्रे रसेलचा हा VIDEO घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ
- ‘द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; कमाईत होतोय एवढा टक्के तोटा!
- “आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य


