Share

‘चंद्रमुखी’चा खरा चेहरा आला समोर! ‘ही’ अभिनेत्री साकारणार चंद्राची भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा रीलिज झालेल्या पहिल्या पोस्टरपासून चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. सिनेमात ‘चंद्रमुखी’ ची भूमिका कोणत्या अभिनेत्रीनं साकारली आहे याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ‘चंद्रमुखी’चा चेहरा समोर आला आहे. तर चंद्रमुखीची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलरकरनं साकारल्याचं समोर आलं आहे. आज प्रेक्षकांसमोर ‘चंद्रमुखी’चा खरा चेहरा आला.

चंद्राला भेटण्यासाठी, तिची पहिली झलक पाहण्यासाठी मराठी कलाकारांनी देखील मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचे दिसले. सोनाली खरे, क्रांती रेडकर, पूज सावंत, महेश कोठारे, समीर चौगुले, मृणाल कुलकर्णी यांच्यासह संगीत क्षेत्रातील लोकप्रिय जोडी अजय- अतुल यांनी देखील हजेरी लावली होती. राजश्री मराठीनं या सोहळ्याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. चंद्रा पाहण्याची अतुरता होती ती संपली आहे. ‘चंद्रमुखी’ चेहरा आदिनाथ कोठारेने सर्वांच्या समोर आणला. त्याच्या हस्ते तिच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.

नेटकऱ्यांनी यापूर्वीचं अंदाज लावला होता की, चंद्रमुखीची भूमिका अमृता खानविलकरनं साकारली आहे. आज नेटकऱ्यांचा अंदाज खरा ठरला. अनेकांनी कमेंटमध्ये देखील यापूर्वी अमृताच्या नावाचा उल्लेख केला होता चंद्रमुखी’ हा सिनेमा एक राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या ‘चंद्रा’ची प्रेमकहाणी आहे. दिग्दर्शक प्रसाद ओकने 16 मार्च 2022 रोजी शेअर केलेल्या टीजरमध्ये खा. दौलत देशमाने अर्थात त्या ध्येय धुरंधर नेत्याचा लुक रीव्हिल केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!