Share

श्रेयस अय्यर पुनरागमनासाठी सज्ज, टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य

Published On: 

मुंबई : मार्च महीन्यात भारत दौऱ्यावर इंग्लंडचा संघ आला होता. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर तो दुखापतीमुळे अद्यापही मैदानाबाहेर आहे.

यानंतर श्रेयस अय्यरच्या खाद्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यादरम्यान श्रेयसने आयपीएल स्पर्धेतूनही माघार घेतली होती. मात्र आता तो पुर्णपणे फीट झाला आहे. काही दिवसापुर्वीच त्याने सरावाला सुरुवात केली आहे. येत्या महिन्यातील आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत हंगामात भाग घेण्यासाठी सज्ज आहे. यादरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याचे आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळवण्यावर लक्ष्य असणार आहे. असे सांगितले.

यावेळी तो म्हणाला,’टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा ही कायमच असते. दुखापतीमुळे संघात पुनरागमन करण्यासाठी मी सज्ज आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान चांगला खेळ करुन मला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळवायचे आहे.’ यादरम्यान अय्यरच्या दुखापतीदरम्यान भारतीय संघात सुर्यकुमार यादव आणि इशान किशनने पदार्पण केले आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरसाठी टीम इंडियात पुनरागमन करणे अवघड असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!