Share

इंग्लंडविरुद्धच्या टी-२०त श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देऊन लोकेश राहुल आणि शिखर धवन ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला. लोकेश राहुल, शिखर धवन आणि कर्णधार कोहली हे आघाडीचे तीन फलंदाज झटपटमाघारी परतल्यांन भारतीय संघ अडचणीत सापडला होता. रिषभ पंतनं आणि हार्दिक पांड्याने फटकेबाजी करून गाडी रुळावर आणली.

यादरम्यान चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. या खेळी दरम्यान श्रेयसने रोहित शर्माच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. आघाडीचे तीन फलंदाज एकेरी धावावर माघारी परतल्यानंतर अर्धशतक करणारा श्रेयस हा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. हा पराक्रम रोहित शर्माने २०१० मध्ये ऑस्ट्रेलीया विरुद्ध केला होता.

तसेच भारताकडून चौथ्या क्रमांकावर टी-२० सामन्यात सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या यादीत तो युवराज सिंगनंतर श्रेयस अय्यरचा नंबर लागतो. संपुर्ण २० षटकें खेळून भारताची तिसरी निचांकी धावसख्या ठरली. यापुर्वी इंग्लंडविरुद्ध ९ बाद १२० धावा तर दक्षिण अफ्रिकेविरुद्ध ८ बाद ११८ धावांचा निचांक भारतीय संघाने केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!