Share

बधाई हो…ताराने दिल्या बुमराहला लग्नच्या शुभेच्छा, पहा पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ज्याप्रमाणे बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी गुप्त योजना असल्याच्या चर्चा असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्स च्या देख्हील जीवनाबद्दल माध्यामांमध्ये चर्चा असतात आता देखील अशीच एका खेळाडूच्या सुट्टी दरम्यान एक बातमी आली आहे. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूचा विवाह होणार आहे.

यामध्ये काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे.

बुमराहची होणारी भावी बायको कोण आहे? याबाबत सुरुवातीला दोन नावांची जोरदार चर्चा होती. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण बुमराह स्पोर्ट्स प्रेझेंटेटर सजंना गणेशन हिच्याशी लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला बुमराहचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी जोडलं जात होतं. या संदर्भात दोघांनीही अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र, अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मीडियावर पोस्ट करत या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय.

https://www.instagram.com/p/CMP2389Mpp1/?utm_source=ig_web_copy_link

तारा शर्मा सलुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जसप्रीत, तारा आणि तिचे मुलं दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ताराने दिलेल्या कॅप्शनमुळे जसप्रीत आणि संजनाच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. “जसप्रीत आणि संजना तुम्हाला तुमच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा. ताराशर्मा शोमधल्या तुझ्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल धन्यवाद, आणि तुम्हाला दोघांना एकत्र ६व्या पर्वात पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तुझ्या संपुर्ण कुटूंबाला खूप खूप शुभेच्छा.” अशा आशयाचे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!