🕒 1 min read
पुणे: सध्या महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांनी वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी पुणे- मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करू शकतो. पुणे शहरात पण आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला या दोन पक्षात जोरदार चुरस आहे. त्यातच आज पुणे शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.
काहीच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षातील नगरसेवक आणि नेते आमच्या पक्षात येणार आहेत अशी घोषणा केली होती. काहीच महिन्यांपूर्वी मनसेच्या नेत्या आणि पुणे मनपाचे माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पुणे शहरात मनसेला खिंडार पाडले होते. तर आज पुणे शहरातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जयश्री मारणे या मनसेच्या माजी नगरसेविका आहेत.
या पक्षप्रवेशावर टीका करताना भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ” एकच गुन्हा राष्ट्रवादी पुन्हा” अश्या प्रकारच्या खोचक ट्विटने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. रुपाली ठोंबरे आणि जयश्री मारणे यांच्या पक्षप्रवेशनांतर भाजपचे आणखीन १३ विद्यमान नगरसेवक आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत असे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- भारताने सामना जिंकला मात्र कर्णधार रोहित नाराज
- “तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी…”, बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना पाठिंबा
- राजकीय कार्यक्रमांना जल्लोष! शिवजयंतीला का नाही? सरकारचे शिवजयंती विरोधी धोरण
- संजय राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- विलियम्सच्या लहान मुलीसोबत फोटो शेअर करत वॉर्नरने केली भावनिक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
