मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्याचे कारण सांगत ठाकरे सरकारने राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत. राज्यातील मंदिरे खुली करण्यावरुन राज्यात मोठे राजकारण सुरु आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर विरोधक टीका-टिपण्णी करत आहेत. यातच सुरुवातीला भाजपने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केल्यानंतर मनसेने देखील आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या मागणीचा चांगलाच समाचार घेतला असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि केंद्र सरकारने केलेली सूचना याचा दाखला ते देत आहेत. दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून भाजप नेत्यांना टोला लगावला.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केलं. ‘आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, कि त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत,’ असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राने महाराष्ट्राला दिलेला इशारा गणेश मंडळांनी पाळला पाहिजे – राजेश टोपे
- आधी भानगडी करणारेच सरकारमध्ये होते, तर ईडी कशाला कारवाई करेल?; भाजपचं पवारांना प्रत्युत्तर
- ब्राह्मण समजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक
- ‘भाजपाकडे लाचखोर नवऱ्याची बायको, हे चित्र लोकांना विचित्र वाटते!’, मेहबूब शेख यांचा हल्लाबोल सुरूच
- ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

