🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्यासह त्यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
सुरुवातीला हे दोघेही घरीच विलगीकरणात होते. मात्र, प्रकृती खालावल्याने रश्मी ठाकरे यांना HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रश्मी ठाकरे यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता होम क्वारंटाईन आहेत.
गेल्या वर्षी कोरोना रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, आर्थिक डबघाई, अवकाळी पाऊस, वादळ अशा अनेक समस्यांना जनतेला सामोरे जावे लागले होते. तर, याकाळात जनता संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच असल्याची टीका भाजपसह इतर विरोधी पक्षांनी केली होती.
माझी जबाबदारी… मीच विसरलो…!!
माझ्या घरात… मीच क्वारंटाईन…
महाराष्ट्र सोडला वाऱ्यावर…!#CmQuarantine
— Prasad Lad (@PrasadLadInd) April 6, 2021
आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कोरोना स्थिती बिकट होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरीच आहेत, अशी टीका भाजप नेत्याने केली आहे. ‘माझी जबाबदारी… मीच विसरलो!! माझ्या घरात… मीच क्वारंटाईन… महाराष्ट्र सोडला वाऱ्यावर…!’ असं ट्विट करत भाजप नेते व आमदार प्रसाद लाड यांनी खोचक टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘घनश्याम तू लेखक म्हणून बिकावू तर आहेस पण माणूस म्हणून नीच आहेस, तुला आम्ही चोप देणार’
- दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ? शिक्षणमंत्री गायकवाड यांची बैठक संपली
- ‘बीसीसीआयकडून योग्य ती खबरदारी ; खेळाडूंसाठी बायो-बबल तयार’
- सरकार उगीच पाडता येत नाही, मंत्र्यांची कृत्ये देखील तशीच आहेत; राज ठाकरेंच सूचक विधान
- कौतुकास्पद : ‘या’ शेतकऱ्याने केले वर्षभर फळ देणारे आंब्याचे वाण विकसित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
