Share

मुंबईत भाजपचा शिवसेनेला धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रदूरभाव झपाट्याने वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला राजकीय क्षेत्रात मात्र मोठ्या घडामोडी सुरु असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यात दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात असतानाच आता भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांना जवळपास वर्षभराचा अवधी असतानाच सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. राज्याची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबई शहराच्या महापालिकेवर आपलीच सत्ता असावी यासाठी राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत.

दरम्यान, आज भाजप स्थापना दिवसाचा मुहूर्त साधत शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व तृप्ती सावंत यांनी केले होते. मात्र, त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला येत्या निवडणुकांमध्ये याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१९ मध्ये तृप्ती सावंत यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्या ऐवजी तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती. तर, तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत ही निवडणूक झाली. यामुळे शिवसेनेचे उमेदवार असलेल्या महाडेश्वर यांना पराभव स्वीकारावा लागला. तर, तृप्ती सावंत यांचा देखील प्रभाव झाला होता. या बंडखोरीचा फायदा काँग्रेसला झाला. झिशान सिद्दीकी यांनी ‘मातोश्री’च्या अंगणात काँग्रेसचा झेंडा फडकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!