जालना: एकीकडे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात आठवडाभरापासून लसींचा तुटवडा निर्माण झाला असून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रानंतर आता जिल्हास्तरावरही उसनवारी सुरू झाली आहे. सोमवारी जालना शहरातील स्त्री रुग्णालयातून शहरी नागरी आरोग्य केंद्र व इतर तीन केंद्रांना दिवसभर पुरतील एवढ्या लसी दिल्या. जिल्हाभरातील ५१ लसीकरण केंद्रांवर मोजक्याच लसी उपलब्ध असल्यामुळे केवळ ३ हजार ६३८ लाभार्थींनाच लसी देता आल्या.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २ हजार ९५० लाभार्थींनी पहिला, तर ६८८ जणांनी दुसरा डोस घेतला. जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालये अशी १०, खासगी दवाखाने ५, तर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व शहरी उपकेंद्र ३६ अशी या ५१ केंद्रांवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ४१७ व्हायल्स वापरण्यात आल्या.
शासनाकडे जालना जिल्ह्यासाठी पावणेदोन लाख डोसची मागणी केली आहे. मात्र, सर्वत्र तुटवडा असून जालन्यासाठी एक हजार डोस मिळणार आहेत.अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली त्याच बरोबर येणाऱ्या काळात अजून लसी मिळतील अपेक्ष त्यांनी व्यक्त केली. त्यामुलर लसीकरणाला आणखीन वेग येईल आहि अपेक्ष त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींच्या नेतृत्वात देशात कोरोनमुक्ती सोडाच, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे’
- ‘चाचा विधायक है हमारे’, फडणवीसांच्या पुतण्याने नियमावली धुडकावत घेतली कोरोना लस !
- सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजाचा बोलबाला; राजस्थानला ४५ धावांनी केले पराभूत
- मोठी बातमी : देशातील कोरोना स्थिती गंभीर; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची मंत्रिमंडळ बैठक !
- जर पराभव झाला असता तर तो माझ्यामुळे; संथ खेळीवर धोनीची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

