मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
विजयानंतर बोलताना धोनी म्हणाला की,’जर आमचा संघ पराभुत झाला असता तर त्याला जबाबदार माझी संथ खेळी ठरली असती. सामन्यात मी खेळलेले पहिले ६ चेंडु संघासाठी महागडे ठरले असते. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही.’ यावेळी पुढे बोलताना धोनी म्हणाला की, आम्ही एक संघ म्हणून १८० पेक्षा जास्त धावा केल्याचा मला आनंद आहे. तरीही आम्ही यापेक्षाही अधिक धावा केल्या असत्या असे मला वाटते.’ असे म्हणाला. या सामन्यात चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी आला होता. चेन्नईने आपल्या डावात १८८ धावांचे लक्ष्य राजस्थानसमोर ठेवले. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने १७ चेंडुत १८ धावा केल्या होत्या यात धोनीने दोन चौकार लगावले होते.
धोनीने वाढते वय आणि तंदुरुस्तीबद्दल बोलताना म्हणाला,’वयस्कर होणे आणि तंदुरुस्त राहणे, या दोन कठीण गोष्टी आहेत. खेळताना तुम्ही २४ वर्षाचे असो वा ४० वर्षाचे तुम्ही तुमची कामगीरी चांगलीच होईल याची शाश्वती नाही देऊ शकत. मात्र जर कुणीही मला तु फीट नाही असे म्हणत नाही, ही गोष्ट खरच माझ्यासाठी सकारात्मक आहे. असे कशी करता हे तुमच्या हातात नसते. मात्र जर तुम्हाला कुणी फीट म्हणत नसेल तर ते चालणार नाही. संघातील तरुण खेळाडूसोबत खेळणे हे आव्हानात्मक असते.”
महत्वाच्या बातम्या
- चेन्नई सुपर किंग्सची गुणतालीकेत भरारी; मुंबई आणि दिल्लीला टाकले मागे
- ‘चाचा विधायक है हमारे’, फडणवीसांच्या पुतण्याने नियमावली धुडकावत घेतली कोरोना लस !
- तिच तारीख, तोच कर्णधार, संघही तोच.. अगदी निकालही तोच.. बदलले फक्त वर्ष ; माहीचा अनोखा पराक्रम
- ‘मोदींच्या नेतृत्वात देशात कोरोनमुक्ती सोडाच, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे’
- सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजाचा बोलबाला; राजस्थानला ४५ धावांनी केले पराभूत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

