Share

सलग दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजाचा बोलबाला; राजस्थानला ४५ धावांनी केले पराभूत

Published On: 

मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी वानखेडे मैदानात झालेल्या चेन्नई सुपर किंग्स संघाने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या १८९ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ ९ गडी गमावत १४३ धावांपर्यंत मजल मारु शकला. ३ षटंकात अवघ्या ७ धावा देत ३ गडी बाद करणाऱ्या मोईन अलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

फलंदाजीसाठी नंदनवन असलेल्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजानी कर्णधार सॅमसनचा निर्णय सार्थ ठरवत चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजाना खेळपट्टीवर जम बसु दिला नाही. मात्र राजस्थानचे गोलंदाज संघ चेन्नईच्या धावगतीला लगाम घालु शकला नाही. त्यामुळे निर्धारीत २० षटकात चेन्नईने ९ गडी गमावत १८८ धावांचे लक्ष्य राजस्थासमोर ठेवले. सलामीवीर डु प्लेसीसने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. तर राजस्थानकडून चेतन सकेरीयाने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

सामन्याच्या दुसऱ्या डावात राजस्थानने चांगली सुरुवात केली. मात्र पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावल्याने राजस्थानच्या धावगतीला लगाम बसला. सलामीवीर जोस बटलरने चांगली फलंदाजी विजयाच्या आशा जिंवत केल्या होत्या. मात्र १२ व्या षटकात बटलर बाद झाला आणि चेन्नईच्या फिरकीपटूनी फासा अवळत राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावु दिले नाही. चेन्नईच्या गोलंदाजानी राजस्थानला २० षटकात १४३ धावावर रोखले. राजस्थानकडून सलामीवीर जोस बटलरने सर्वाधिक ३५ चेंडुत ४९ धावांची खेळी केली. तर चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!