Share

‘चाचा विधायक है हमारे’, फडणवीसांच्या पुतण्याने नियमावली धुडकावत घेतली कोरोना लस !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दरम्यान, कोरोना रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आले आहे. सुरुवातीला कोव्हीड योद्ध्यांना लस देण्यात आल्यानंतर ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना, यानंतर आता ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यात येत असताना देखील महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोरोना रोगाचा संसर्ग वाढल्याने नागरिकांनी लसीकरण करण्यास प्राधान्य दिले. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन यांनी देखील यासाठी परिश्रम घेतले. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना केंद्रावरून लस न घेताच माघारी परतावं लागलं. दरम्यान, आता काही प्रमाणात साठा देण्यात आल्याने लसीकरण पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहे.

तर, सध्या फक्त ४५ वर्षांपुढील नागरिकांनाच लसीकरण करण्यास परवानगी असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याने लसीकरण करून घेतले आहे. वयोवर्षे ४५ च्या आतील असतानाही तन्मय फडणवीस याने लसीकरण केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याच्यावर चांगलीच टीकेची झोड उठली आहे.

त्याने तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. यामुळे त्याचे वय ४५ च्या पुढील नसताना, तो फ्रंट लाईन वर्कर नसतानाही त्याचे लसीकरण कसे झाले ? असे सवाल निर्माण होत आहेत. ‘चाचा विधायक है हमारे ‘ असा एक फेमस हिंदी डायलॉग टाकून त्याचा व देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Cryptic_Miind/status/1384140451855278095?s=20

१ मे पासून १८ वर्षांपुढील वयोगटासाठी लसीकरण होणार सुरु !

कोरोनाचा वाढता धोका पाहता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी अनेक राजकीय नेते आणि वैद्यकीय तज्ञांनी केली होती. लसीकरण ही कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव पर्याय असल्याने आता केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!