मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील वेळीच्या लाटेपेक्षा यंदा अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असतानाच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पंचसूत्री मांडली आहे. याचे काटोकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, इस्राईल हा देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा काल करण्यात आली आहे. या देशातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून जनजीवन ‘नॉर्मल’ झाले आहे. यावरूनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
सामना अग्रलेख –
कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रायलने देश कोरोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले.
मनमोहन यांचे मार्गदर्शन राष्ट्रहितासाठीच आहे. त्यास राहुल गांधींनीही हातभार लावला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी प. बंगालमधील सर्व सभा रद्द केल्या हासुद्धा कोरोना नियंत्रित करण्याचा धाडसी उपाय आहे. इस्रायलने गेले वर्षभर हाच मार्ग अवलंबला. बहुधा मनमोहन सिंग यांची ‘मन की बात’ बेंजामिन नेतान्याहूपर्यंत पोहोचली असेल. आता ती मनमोहन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंतही पोहोचवली आहे. त्याप्रमाणे काही जमतंय का बघा!
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे प. बंगालच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून दिल्लीस परतले आहेत. दिल्लीत येताच दोघांनीही कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावून कोरोनाच्या गांभीर्याबाबत चर्चा केली, तर श्री. शहा यांनी स्पष्ट केले की, घाईघाईने लॉक डाऊन लावण्याची गरज नाही. मोदी यांना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच. इस्रायल या देशाने कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे.
पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने कोरोना लढय़ाचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात कोरोनामुक्त होईल असे वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते. पण कोरोनामुक्ती सोडाच, देशात कोरोनाने घातलेले थैमान हाताबाहेर गेले. इस्रायलने देश कोरोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले.
फालतू राजकारण, थाळय़ा किंवा टाळय़ा पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही. आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले. मनमोहन हे शांतपणे काम करणारे नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांनाही मनमोहन सिंग यांनी काही सूचना केल्या आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे. पुढील सहा महिन्यांत राज्यांना कशा पद्धतीने लसपुरवठा होईल याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे, असे श्री. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना सुचवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- शहरात जोरात नाका बंदी तरीही तीन दुचाकी चोरीला
- प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन, रेमडेसिवीरची गरज नाही! केंद्रेकरांनी खासगी रुग्णालयांना फटकारले
- विद्यार्थिनीने फी न भरल्याचे सोशल मीडियावर सांगितले, शिक्षिकेवर अॅट्रोसिटी
- लवकरच पुरेसा रेमडेसिवीरचा साठा होणार उपलब्ध, सात रेमडेसिवीर निर्मात्या कंपन्यांशी चर्चा सुरु
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

