Share

परभणी जिल्ह्यात गुरूवारी १२६५ जण कोरोना बाधित; २१ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

परभणी : जिल्ह्यात गुरूवारी १ हजार २६५  व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समाेर आली आहे. तसेच ४८९ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.

रुग्णालयातील कक्षात ७ हजार ८४६ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ८७२ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ३५ हजार ४३५ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी २६ हजार ७१७ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत २ लाख ३९ हजार ६२७ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात २ लाख ४ हजार १९३ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ३४ हजार ३४४ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ९५० अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटद्वारे कळवले आहे.

कोरोनाचा कहर खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दी जमवू नये, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सॅनेटायरचा वापर नियमीतपणे  करावा. मास्कचे नियमीतपणे पालन करावे. हात नियमीतपणे स्वच्छपणे धुवावेत. नागरिकांनी आरोग्याबद्दल काहीही तक्रार वाटल्यास जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांना दाखवून आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. काही त्रास होत असल्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयातून योग्य ती औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!