Share

औरंगाबादेत जगण्याच्या विवंचनेत सापडलेले मनपा कर्मचारी साजरा करणार ‘आर्थिक शोषण दिन’!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेतील कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. बाहेर कोरोना आणि त्यातच नियमित पगार होत नसल्यामुळे दैनंदिन खर्च भागवतांना मोठी ओढाताण सहन करावी लागत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतन न झाल्याने कायम कर्मचाऱ्यांबरोबरच कंत्राटी कर्मचार्‍यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्र दिन तसेत कामगार दिनी (१ मे) आर्थिक शोषण दिन साजरा करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या प्रशासकांना दिला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटी अनुदानावर अवलंबून आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे अनुदान मि‌ळण्यात अनियमितता आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. महापालिकेत कायम कर्मचारी, सिडकोकडून महापालिकेकडे हस्तांतरित झालेले कर्मचारी, दैनिक वेतनावरील कर्मचारी, उद्यान-यांत्रिकी व मलेरिया विभागाचे कर्मचारी, तसेच कंत्राटदार एजन्सीजच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी असे जवळपास दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांच्या पगारात अनियमितता असल्याचे कामगार शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात यांनी सांगितले. वास्तविक दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पगार होणे अपेक्षित आहे, राज्यातील अन्य महापालिकेत त्यानुसार पगार केले जातात. शासनाकडून जीएसटीचे पैसे मिळाले नाहीत तर, पालिका फंडातून पगार केला जातो, परंतु औरंगाबाद महापालिकेत ही पद्धत अवलंबली जात नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!