Share

घाटीत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता; याला जबाबदार कोण? औरंगाबादेत परिचारिकांचे आंदोलन!

Published On: 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात सेवा करताना रुग्णसेवेसाठी लागणारे मुबलक साहित्य उपलब्ध करून द्यावे. या मागणीसाठी बुधवारी (दि.२५) सकाळी घाटी रुग्णालयात शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनाच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले. आपल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाईल हे सांगितल्यानंतर दोन तासांनी परिचारिका पूर्ववत कामावर रुजू झाल्या. कक्षामध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

रुग्णालयात काम करताना मनुष्यबळाची कमतरता आणि रुग्णसेवा बजावताना रुग्णांना लागणाऱ्या वस्तूंचा मुबलक पुरवठा त्वरित करण्यात यावा. वॉर्डात मनुष्यबळ वाढवावे. यांसह विविध मागण्यांसाठी बुधवारी शासकीय घाटी रुग्णालयातील सुमारे तीनशे पुरुष, महिला कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन केले. यावेळी आहे त्या सर्वन्टमध्ये योग्य नियोजन केले नसल्याने कक्षामध्ये चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ओढण्याचे कामे करावे लागतात. त्यामुळे चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांचे योग्य नियोजन करण्यात यावे.

याशिवाय कक्ष स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य नसल्यामुळे परिचारिकांना स्वतःच्या पैशातून साहित्य खरेदी करावे लागते. त्यामुळे खराटा, फिनेल, कचरा टाकायच्या बॅग त्वरित पुरविण्यात याव्यात. याशिवाय कक्षामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण व्यवस्थित होत नाही. तसेच सर्व सुविधा त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी शासकीय परिचारिका संघटनाचे अध्यक्षा शुभमंगल भक्त, सचिव इंदुमती थोरात, सहचिटणीस महेंद्र सावळे आदींच्या वतीने करण्यात आली. यावेळी या मागण्याचे निवेदन देखील  परिचारिका संघटनेच्या वतीने घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांना देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!