🕒 1 min read
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेने क्रांती चौकात जोरदार आंदोलन केले. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकात झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची उपस्थिती होती. मात्र यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची अनुपस्थिती ठळकपणे दिसून आली. क्रांती चौकात आंदोलन सुरू असताना खैरे कुठे होते? हा प्रश्न विचारला जात होता. मात्र खैरेंनी आंदोलनाला येण्याऐवजी पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांना भेटून नारायण राणे यांच्या अटकेबाबत निवेदन देणेच पसंत केले. त्यामुळे राणे प्रकरणातही शिवसेनेची एकजूट दिसून आलोली नाही. खैरे आणि दानवे यांची तोंडे विरुद्ध दिशेला असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
आंदोलनामध्ये शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. जिल्हाप्रमुख दानवे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राजू वैद्य, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे आदींची उपस्थिती होती. त्याच वेळी चंद्रकांत खैरे यांनी देखील पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांची भेट घेतली. व नारायण राणे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ उपस्थित होते.
क्रांती चौकात शिवसेनेच्या झालेल्या आंदोलनानंतर युवासेनेने देखील याच ठिकाणी आंदोलन केले. मात्र शिवसेनेपेक्षा युवा सेनेचे आंदोलन जोरदार ठरले. सर्वत्र या आंदोलनाची चर्चा होती. याठिकाणी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत युवा सैनिकांनी एकच गोंधळ घातला. या प्रेतयात्रेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यापूर्वी शिवसेनेची होणारी आंदोलने एकत्रितपणे केली जात होती. मात्र आता निर्माण झालेल्या अंतर्गत गटबाजीमुळे गटागटाने आंदोलन करण्याची पद्धत रूढ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हे आता लक्षात आलंय-नारायण राणे
- ‘ “त्या” वेळीही उद्धव ठाकरेंनी राणेंविरोधात षडयंत्र केलं होतं; आताही त्यांच्या पोटात दुखतंय’
- बापाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘राणे’ला शिक्षा झालीच पाहिजे – आ. रमेश बोरनारे
- ‘नारायण राणेंचं एन्काऊंटर करणार’, शिवसेना नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- कल्याणसिंह : राम मंदिरासाठी सत्तेचा त्याग करणारे उत्तम शासक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
