Share

धक्कादायक ! मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार : सायन रुग्णालयातील व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई : मुंबईतील सायन रुग्णालयातील धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ हा व्हायरल झाला होता. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फॅॅक्ट चेक केलं. त्यानंतर हा व्हिडीओ खरा असल्याचं सांगत या घटनेची तक्रार भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) करण्यात आली आहे.

आमदार नितेश राणे आणि मिलिंद देवरा  यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते. या वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवल्याचे दिसत आहे. बाजूच्या खाटांवर मृतदेह असताना इतर रुग्णांवर उपचार सुरु होते. काही रुग्णांचे नातेवाईकही वॉर्डमध्ये ये-जा करत होते.

त्यांनतर किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओबाबत चौकशी केली. त्यानंतर ही व्हिडीओ खरी असल्याचं समोर आलं. यावर रुग्णालयातील डॉक्टरांनीही याची कबुली दिली आहे. मृत रुग्णांचे नातेवाईक बॉडी क्लेम करायला लवकर येत नाहीत. तर दुसरीकडे नव्याने येणाऱ्या रुग्णांनाही दाखल करून घ्यावे लागते. त्यामुळे नाईलाजाने मृतदेह वॉर्डातच ठेवावे लागत असल्याची माहिती सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांनी दिली.

तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका प्रशासनाची बाजू मांडली आहे. नातेवाईकांकडून मृतदेह ताब्यात घेण्यासंबंधी दिरंगाई केली जाते. नातेवाईक जर येत असतील तर मृतदेह तिथेच प्लास्टिक रॅप करुन देण्याचा विचार प्रशासनाने केला असावा, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

महत्वाच्या बातम्या

अजूनही मजुरांना तिकीट काढूनचं जावं लागतय, ‘त्या’बाबत रेल्वेकडून कोणताचं आदेश आला नाही

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती

परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!