Share

परदेशातील भारतीयांना आणण्यासाठी ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच, INS जलाश्व मालदीवमध्ये दाखल

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनामुळे विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी भारत सरकारने नौदलाच्या साह्याने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ लाँच केले आहे. या ऑपरेशनतंर्गत भारतीयांना परत आणण्यासाठी नौदलाची ‘आयएनएस जलाश्व’ ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.

याबबत नौदलाच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आयएनएस जलाश्व बरोबर आयएनएस मगर ही युद्धनौका सुद्धा या मिशनमध्ये असणार आहे. पहिल्या टप्प्याच्या ऑपरेशनमध्ये मालदीवमधून १ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. मालदीवमधून भारतात येताना नागरिकांना COVID-19 संबंधित सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे लागेल.

मायदेशी परतणाऱ्या भारतीयांना प्रवासादरम्यान बेसिक आणि वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील. सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द केले जाईल.

परराष्ट्र, संरक्षण, गृह, आरोग्य आणि अन्य मंत्रालयांशी समन्वय राखून ऑपरेशन समुद्र सेतू सुरु असल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. भारताने आयएनएस शार्दुल ही युद्धनौका संयुक्त अरब अमिरातीला पाठवली आहे. याशिवाय १२ देशांमध्ये अडकलेल्या १५ हजार भारतीयांना परत आणण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

अजूनही मजुरांना तिकीट काढूनचं जावं लागतय, ‘त्या’बाबत रेल्वेकडून कोणताचं आदेश आला नाही

राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती

लढा! ‘कोरोना’विरोधात : पुणे मनपातील भाजप नगरसेवकांचे मार्च महिन्यांचे मानधन पंतप्रधान निधीला

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!