Share

धक्कादायक! टेस्टच्या दोन महिन्यांनंतर मनपाचा रुग्णांना फोन, ‘तुम्ही पॉझिटिव्ह होतात, आता कसे आहात?’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : १ एप्रिलला आरटीपीसीआर तपासणी केली, ९ एप्रिलला तब्येतीची विचारपूस झाली आणि चक्क ८ जूनला २ महिने ८ दिवसांनी आपण एप्रिल महिन्यात पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. कोरोना पॉझिटिव्ह असताना आपण घरात, कामाच्या ठिकाणी, आसपास सर्वत्र खुलेआम वावरलो. घरात कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र कामाच्या ठिकाणी असणाऱ्या सहकाऱ्याला १० एप्रिलला कोरोनाची लागण झाली. सोबतच घरातील ११ सदस्यही पॉझिटिव्ह. सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना न घडता सर्व बरे झाले. मात्र या संपूर्ण प्रकारात मनपाचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा, बेपर्वाईची भूमिका दिसून आली.

शहरातील वाळूज औद्योगिक परिसरात असलेल्या एका नामांकित कंपनीत अमितकुमार सतिशचंद्र रावडे अभियंता म्हणून नोकरीला आहेत. २७ मार्च २०२१ ला त्यांना काम करताना अंगदुखीचा त्रास जाणवला. मात्र मार्च एंडिग असल्याने कामाचा ताण अधिक होता. त्यामुळे त्यांना सुट्टी मिळाली नाही. दोन ते तिन दिवसांनंतर त्रास वाढल्याने त्यांनी राहत असलेल्या भागात बेगमपुऱ्यातील खाजगी दवाखान्यात स्वत:ला दाखवले. याठिकाणी काही औषधी देऊन त्यांना आरटीपीसीआर तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार अमित यांनी १ एप्रिलला मध्यवर्ती बसस्थानक येथील तपासणी केंद्रांवर जाऊन स्वतःची तपासणी करुन घेतली.

तपासणीचा अहवाल रात्री १० पर्यंत तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे कळेल असे सांगण्यात आले. मात्र पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही कळवले गेले नाही. दरम्यान त्याआधी गोलवाडी फाट्यावरील केंद्रात जाऊन रिपोर्ट न आल्याचे सांगितले, तेथील डॉक्टरांनी त्यांचा आरटीपीसीआर आयडी पाहून तपासून तुम्ही निगेटिव्ह असाल म्हणूनच एसएमएस आला नाही असे सांगितले. त्यानंतर ते निश्चिंत मनाने ऑफिसला जाऊ लागले. ९ एप्रिलला मनपातून पहिला फोन आला ज्यात तब्येतीची विचारपूस करण्यात आली.

मात्र यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह याबाबत काहीही कळू दिले नाही. त्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी ८ जूनला महानगरपालिकेतून फोन आला आपली तब्येत कशी आहे? आपल्याला गेल्या महिन्यात कोरोना झाला होता हे एेकताच अमित रावडे आतून हलले. ९ जूनला पुन्हा फोन आला यात म्युकरमायकोसिसच्या लक्षणांबद्दल विचारण्यात आले. या दोन्ही फोन्सवर त्यांनी समोरच्या व्यक्तीला जिवाच्या आकांताने समजावून सांगितले कि मला कोविड झाल्याचा रिपोर्ट २४ तासात का मिळाला नाही? मात्र समोरुन याबाबत आम्ही काहीच सांगु शकत नाही आमचे फॉलोअप घेणे एवढेच काम आहे. असे उत्तर मिळाले.

कंपनीतील सहकाऱ्याला आणि कुटुंबीयांना लागण

१० एप्रिल रोजी अमित यांच्या सोबत राहणाऱ्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाली. आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण ११ व्यक्ती पॉझिटिव्ह आले. यामध्ये त्यांच्या वृद्ध आई-वडीलांचाही समावेश होता. मात्र सुदैवाने कोणीही दगावले नाही. तसेच अमित यांच्या घरातही लहान बाळ, वृद्ध आई होती. त्यामुळे त्यांना काही झाले असते तर या सर्वांना जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत ‘महाराष्ट्र देशा’ने अतिरिक्त आयुक्त बी. बी नेमाने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चौकशी करतो असे उत्तर दिले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!