Share

सहकारमहर्षी व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे उर्फ काकासाहेब यांचे शुक्रवारी रात्री वृद्धापकाळाने निधन

Published On: 

🕒 1 min read

लातूर: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे (वय ९६) यांचे शुक्रवारी (ता. ११) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना काकासाहेब म्हणून ओळखलं जायचं. जुन्या उस्मानाबाद म्हणजेच जेव्हा लातूर आणि उस्मानाबाद एकत्र होते तेव्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष देखील होते.

काकसाहेबांनी जिल्हा परिषदेचे व ढोकीच्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले होते. मुरूड ग्रामपंचायतीचे त्यांनी तब्बल ३८ वर्ष बिनविरोध सरपंच पद गाजवलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नाडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच म्हणजेच विद्यार्थीदशेतच त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. निझामाच्या विरोधात त्यांनी सशस्त्र लढा दिला होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी बीडचे तत्कालीन खासदार बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली मुरूड परिसरात ग्रामविकासाला सुरवात केली. ग्रामविकासाच्या अनेक योजनांची सुरूवात त्यांच्या पुढाकाराने झाली. यातूनच खादी ग्रामोद्योगातून विणकाम, हातकाम, तेलघाना, सुतकताई आदी उद्योग सुरू झाले.

काकसाहेबांनी १९५२ मध्य रूरल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. सहकारी संस्थांचे जाळे त्यांनी उभारले. जिल्हा मार्केटींग संस्थेचे ते अध्यक्ष होते. ढोकीच्या तेरणा साखर कारखाना, लातूरची जिल्हा बँकेची सातमजली इमारत व आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरील डालडा फॅक्टरीच्या ( को – ऑपरेटिव्ह ऑईल इंडस्ट्रीज) स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. दूरसंचार, वीज, रेल्वे, वृक्ष लागवड, फेरभरण आदी क्षेत्रांत त्यांचे उल्लेखनीय काम आहे. तत्कालीन वीज मंडळाचे ते काही काळ सदस्य होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!