Share

‘कुंभमेळ्यासारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वारीसाठी नियम’, अजित पवारांचे स्पष्टीकरण

Published On: 

बारामती : कोरोना प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पायी वारीला परवानगी देण्याऐवजी दहा मानाच्या पालख्या या वेगवेगळ्या ठिकाणांहून बसमधून पंढरपूरला नेण्याचे ठरविण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर अध्यात्मिक आघाडीनं आक्षेप घेतला होता. यावरुन अजित पवार यांनी पुन्हा वारीबाबत स्पष्ट केलं आहे.

आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वारीसाठी काही अटी आणि शर्तीही घालण्यात आल्या आहेत. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. वारीची परंपरा टिकली पाहिजेत. पण कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

‘वारकरी पोलीस, प्रशासनाचे सर्व अधिकारी आणि इतरांशी चर्चा करुनच राज्य सरकारने वारीचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा टिकली पाहिजे, पण सध्या करोनाची सावटही आहे. त्यामुळं वारीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीला शिथिलता देण्यात आली आहे,’ अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

आम्ही वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर करतो. राज्याच्या आरोग्याच्या हिताकडेही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागतो. मात्र, वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील तर त्याबाबत विभागीय आयुक्तांना सूचना देऊन संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्यास सांगू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!