🕒 1 min read
नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नायगाव नगरपंचायतमधील कंत्राटी कामगार आनंदराव रोडे यांनी हेडगेवार चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी, बँकेने कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यानेच आत्महत्येची घटना घडल्याची नोंद नायगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनूसार, नायगाव तालुक्यातील देगाव येथील रहिवासी असलेले आनंदराव रोडे हे नायगाव नगरपंचायतमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी सुशीलाबाई आनंदा रोडे यांच्या नावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून २०१८ मध्ये किराणा दुकान टाकण्यासाठी ५ लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते. तसे पत्र बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक यांना दिले होते. त्यात १५ दिवसांत कार्यवाही करण्यासाठी सांगितले होते. पण, बँकेने सदरचे कर्ज न देता फाइल दडपून ठेवली. त्यामुळे रोडे हे शाखा व्यवस्थापकांना कर्ज देण्याबाबत अनेकदा भेटले तरीही, टाळाटाळ करण्यात येत होती.
मंजूर झालेले कर्ज तब्बल तीन वर्षांपासून मिळत नसल्याने अर्थिक विवंचनेत असलेल्या आनंद रोडे यांनी बँकेच्या भिंतीला असलेल्या खिडकीला दोर लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सदरची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी नायगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ‘माझ्या मंत्रिमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही’, मुख्यमंत्र्यांचे अमित शहांना पत्र
- ‘पप्पांना मृत्यू आधीच दिसला होता का?’ आर.आर.पाटलांच्या मुलीची भावूक पोस्ट
- ‘सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची इतिहासात नोंद होईल’
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे


