बीड: जिल्ह्यातील पिंपळनेर गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या पित्याचा कोयत्याने घाव घालून मुलाने निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. श्रीकिसन अंबादास तागड (६०) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच जिल्ह्यात असाच प्रकार काही दिवासांपुर्वी देखील घडला होता.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्रीकिसन अंबादास तागड यांना दारूचे व्यसन होते. ते दारू पिऊन पत्नीला सतत शिवीगाळ व मारहाण करत असत. काही दिवसांपूर्वी सायंकाळी त्यांनी पत्नीशी वाद घातला, शिवीगाळ व मारहाण केली. वडील आईला शिवीगाळ व मारहाण करत असलेले पाहून मुलगा लहू (२२) मध्ये पडला. श्रीकिसन यांचा त्याच्याशीही वाद झाला. या प्रकारानंतर ते शेतात निघून गेले. दरम्यान, ते घरी परत येत नसल्याने लहू त्यांना शोधत शेतात गेला. तेथे पुन्हा बापलेकांत वाद झाला. यावेळी लहूने जवळच्या कोयत्याने श्रीकिसन यांच्यावर वार केले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना कळाली. मृत पित्याच्या भावाने पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. लहूविरोधात श्रीकिसन यांचे भाऊ रोहिदास तागड यांच्या तक्रारीवरून पिंपळनेर पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी लहूला अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पिंपळनेर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- लग्नाचा कार्यक्रम असल्याची बतावणी करत मित्रानेच लांबवली कार
- अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!
- वाळुज एमआयडीसी भागातून चार जुगारी ताब्यात
- एकाबाजूला काँग्रेसची नाराजी, विरोधक आक्रमक तर दुसऱ्याबाजूला पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट !
- कर चुकवेगिरीसाठी दुचाकीवर बनावट क्रमांक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
