🕒 1 min read
मुंबई: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) त्यांच्या वादग्रस्त वकतव्यांमुळे नेहमीच वादात सापडत असतात. नुकतेच मोदी नावाच्या गावगुंडच्या प्रकरणावरून पटोले यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी आंदोलन केले होते. ते प्रकरण पूर्णपणे मिटण्याआधीच आता आणखी एका वादाला नाना पटोले यांना सामोरे जावे लागणार आहे. महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची आजच्याच दिवशी नथुराम गोडसे (Nathuram Godse) नावाच्या आतंकवाद्याने वध केला. महात्मा गांधी संपले असे हिंदुत्ववादी व्यवस्थेला वाटत असेल पण महात्मा गांधी आजही त्यांच्या विचाराने जिवंत आहेत व त्यांचे विचार भविष्यातही जिवंत राहतील, असं नाना पटोले म्हणाले. मात्र त्यात ‘वध’ या शब्दामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
महात्मा गांधी यांच्या बद्दल बोलताना ‘वध’ शब्दप्रयोग करण्यावरून नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. नाना पटोले म्हणाले, गोडसेच्या मते गांधींचा वध झाला, अशा अर्थाने मी ते वाक्य बोललो होते, असे स्पष्टीकरणही नाना पटोलेंनी भाषणानंतर दिलं आहे. मात्र आता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘खरा हिंदुत्ववादी असता तर जिन्नांना गोळी घातली असती, गांधीजींना का मारले ?; संजय राऊत यांचा सवाल
-
पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना पहिला डोस
-
‘या’ महिन्यात होणार पुणे, पिंपरी–चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका
-
‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
