Share

मनसेचे एकुलते एक नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत (BMC) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी ६ नवनिर्वाचित नगरसेवकांनी निवडणूक निकालाच्या दिवशीच पक्षाला रामराम ठोकला आणि शिवसेना (Shivsena) गाठली. आता राज्यातील १५ महानगरपलिकांच्या निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात येऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेसाठी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आलेला दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेचा कालावधी येत्या फेब्रुवारीच्या अखेरीस संपणार आहे. लवकरच महानगपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे एकुलते एक नगरसेवक संजय तुर्डे (Sanjay Tarde) शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया मध्ये एका वृत्त वहिनीचा हवाला देत एक फोटो सध्या गाजत आहे. यावर संजय तुर्डे यांनी मात्र वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे.

संजय तुर्डे म्हणाले, मी कोणत्याही अटीवर मनसे सोडणार नाही. हा एक खोडसाळ प्रचार आहे. माझ्यात आणि पक्षात दरी निर्माण करण्याचे कारस्थान विरोधक करत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक १६६ मध्ये काही समस्या होत्या, त्यावेळी तेथे महापौरांना किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना मी आमंत्रित केले होते. त्यावेळचा तो फोटो व्हायरल करून हा प्रचार सुरू आहे. राजकारण काहीही असले तरी आगामी निवडणुकांत कोण कोणत्या पक्षात जाणार हे लवकरच जनतेला समजेल.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!