🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील सत्ता भाजपने गमावली आहे. पण राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा गोळीबार सुरू आहे. आता त्यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने खऱ्या हिंदुत्ववाद्यावर भाष्य केले आहे.
आज महात्मा गांधीजींची ७४ वी पुण्यतिथी, याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना महात्मा गांधीचा मारेकरी नथुराम गोडसे (Nathuram Godse) आणि हिंदुत्ववादावर रोखठोक सवाल उपस्थित केला. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, कोणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने जिन्नांना गोळी घातली असती, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, देशाचे दोन भाग करण्याची पाकिस्तानची मागणी तर जिन्नांची होती, हिम्मत होती तर त्यांना गोळी घालायला पाहिजे होती. ते अभिमानास्पद आणि देशभक्तिपर कृत्य ठरल असतं. एका फकिराला का मारले? त्यांच्यावरील हल्ल्याच्या आज जगभरात निषेध होतो आहे. त्याचे दुख आज संपूर्ण जगाला आहे, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
पुण्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५६ टक्के बालकांना पहिला डोस
-
‘या’ महिन्यात होणार पुणे, पिंपरी–चिंचवड आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका
-
‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!
-
काय आहे स्मार्ट किऑस्क? औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले होते उद्धाटन..!
-
“अख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे त्यामुळे…”, छगन भुजबळांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
