Share

‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!

Published On: 

औरंगाबाद: ‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ अशा आशयाचे बॅनर लावलेल्या रमेश पाटील यांनी शहरासह महाराष्ट्रात चांगलाच धुरळा उडवला आहे. औरंगाबाद येथील या बॅनरची सर्वत्र चर्चा होतांना दिसून येत आहे. मात्र या प्रकाराने संतप्त झालेल्या भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी बॅनर असलेल्या गुलमंडी, औरंगपुरा, पैठणगेट या ठिकाणी शाई फेक करत हा बॅनर फाडला तसेच रमेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महिला भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

औरंगाबाद शनिवारी रात्री पासून लागलेल्या एका बॅनरने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. ‘निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे’ शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मुख्यत्वे करून यामध्ये जातीची कुठलीही अट नसून आपल्याला तीन मुले असल्या कारणाने आपण निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे लढाऊ उमेदवार पाहिजे असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. रमेश विनायकराव पाटील यांनी शहरातील वर्दळीच्या तीन ठिकाणी हे बॅनर लावले होते.

येणाऱ्या काही महिन्यात औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र या बॅनर भरून भाजप आक्रमक झालेले आहे. भाजपच्या महिला आघाडीने तसेच रमेश पाटील यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही त्यांनी केली आहे. अशा प्रकारचे बॅनर लावणे अत्यंत चुकीचे असून असल्या प्रकारांमुळे महिलांचा अपमान होत असल्याचा आरोप भाजप महिला कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मात्र आपल्याला निवडणूक लढविण्याची इच्छा असून तीन अपत्य असल्या कारणाने आपण निवडणूक लढवू शकत नाही. मात्र समाजासाठी आपली काहीतरी करण्याची इच्छा असल्याने आपण अशाप्रकारे बॅनरबाजी केल्याचे पाटील यांचे मत आहे. आता हे कितपत योग्य आणि अयोग्य हे येणारा काळच ठरवेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!