मुंबई: देशात तसेच राज्यात निवडणुकांचे (State Election Commission) वारे वाहत आहे. सर्वच पक्षांची या निवडणुकांसाठी जोरदार तयारी देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची देखील उत्सुकता लागलेली आहे. पुणे, मुंबई येथील निवडणुका आता लवकरच होणार असून याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंडकर (Kiran Kurundkar) यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंडकर म्हणाले, आमच्या हातात सध्या दोन महत्वाची कामे आहेत. १५ मार्च पर्यंत मतदान विभाग (मतदारसंघ) ठरविणे आणि अंतिम मतदार यादी तयार करणे. त्यापूर्वी जर ओबीसी अरक्षणाबाबात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला तर आम्हाला आणखी आठवडा लागण्याची शक्यता आहे. निवडणूका या सर्व प्रक्रियेनंतर घेतल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुढे बोलताना किरण कुरूंडकर म्हणाले, पुणे महानगरपालिका (PMC), पिंपरी–चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील इतर १५ महानगरपालिकांच्या निवडणुका एप्रिल महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व महानगरपालिकांचा कालावधी संपत आहे. तो काही दिवसांनी वाढण्याची शक्यता आहे.
किरण कुरूंडकर म्हणाले, मे अखेरपर्यंत आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुका घेणे आवश्यक आहे. त्यांनी निवडणूक तारखा सांगण्यास नकार दिला. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पुढील १५ ते २० दिवस सर्व पक्षांना प्रचारासाठी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
‘निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे’ बॅनर संतप्त महिला भाजप कार्यकर्त्यांनी फाडले..!
काय आहे स्मार्ट किऑस्क? औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते झाले होते उद्धाटन..!
“अख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे त्यामुळे…”, छगन भुजबळांची प्रतिक्रिया
“गांधी कुटुंबासाठी गोवा हे फक्त वेकेशन स्पॉट”, अमित शहांचे टीकास्त्र
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा हर्सूल टी पॉईंट येथे बसवण्याची मागणी!


