Share

धक्कादायक: सेना खासदार भावना गवळी यांची कंत्राटदाराला धमकी, ऑडीओ क्लीप व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात स्थानिक नेते कंत्राटदारावर दबाव आणत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. त्याचाच हवाला देत भाजपच्या वतीने एक ऑडीओ क्लीप व्हायरल करण्यात येत आहे. या क्लीपमध्ये खासदार भावना गवळी यांचा आवाज असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार खासदार गवळी या कंत्राटदाराला विकास काम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मनाई करत आहे.

विशेष म्हणजे या क्लीमध्ये संबंधीत व्यक्तीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेवून धमकवले जात असल्याचे ऐकू येते. यामध्ये आणखी एका व्यक्तीचा आवाज आहे. हा आवाज खासदारांच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावाही करण्यात येत आहे. यावरुन आता भाजपच्या वतीने पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकार यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.

खासदार भावना गवळी आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद सध्या सुरू आहे. सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर अनेक आरोप केलेले आहे. त्यात आता या ऑडीओ क्लीपमुळे खासदारांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मात्र, या ऑडीओ क्लीपची सत्यता तपासावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!