Share

विखेंच्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे; इंदिरा गांधी हतबल असताना महाराष्ट्रात झाला होता राजकीय भूकंप!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील महिन्यात दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्या आत्मचरित्रात आपल्यावर काँग्रेस तसेच इंदिरा गांधीच्या विचारांचा पगडा असल्याचे सांगताना स्व.विखे पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्यावर भरभरून लिहिले आहे.

आणीबाणीनंतर याच इंदिरा गांधी हतबल झालेल्या असताना त्यांचे न ऐकणारा एक वर्गही काँग्रेसमध्ये होता. त्या हतबल असताना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाचे राजकारण रंगले होते आणि ते यशस्वीही झाले होते, ही आठवण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे.

देह वेचावा कारणी या आत्मचरित्रात दिवंगत विखे पाटील यांनी म्हटले आहे की, इंदिरा गांधीच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांपैकी आपण एक होतो. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिराजी सत्तेवरून पायउतार झाल्या. सत्तेच्या महत्वाकांक्षेने गोळा झालेली नेते मंडळी दूर गेली.

इंदिराजींचा पराभव सर्वसामान्यांना जिव्हारी लागला होता. ते त्यांच्याजवळ जाऊन ढसाढसा रडत. इंदिराजी आता राजकारणातून संपल्या आहेत. त्यांच्या भरवशावर पक्ष पुढे चालणार नाही, अशी मांडणी काही लोक करू लागले होते.

केंद्रीय नेतृत्व देश आणि समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. केंद्रीय नेतृत्व कमजोर झाले तर काय परिणाम होतात, याचे हे उदाहरण होते. आता अनेक विद्वान इंदिराजींवर गौरवपर लिहू लागले आहेत. भारतातल्या त्यावेळी द्वेषमूलक टीका करणाऱ्या पत्रकारांनी, नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी नंतर साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल खूप लिहिले. इंदर मल्होत्रा या पत्रकाराने इंदिराजींच्या चरित्रात आणीबाणीवर खोचक टीका केली होती, असे स्व.विखे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!