मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी तसेच हिंदी चित्रपटनमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख बनवणारी सोनाली कुलकर्णी यांना वाढदिवसानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा. मराठी सिनेश्रुष्टी मधलं एक असं व्यक्तिमहत्व ज्यांना आपण ‘सो कूल’ म्हटलं तरी देखील तिचा चेहरा आपल्या नजरेसमोर येतो ती म्हणजेच आपणा साऱ्यांची लाडकी सोनाली कुलकर्णी
मूळची पुण्याची असलेली सोनालीचा जन्म ३ नोव्हेंबर १९७४ चा ब्राम्हण कुटुंबामध्ये जन्मलेल्या सोनालीने आपलं शिक्षण अभिनव विद्यालयातून पूर्ण केलं आणि त्या नंतरच तिला लेखनाची आवड लागली ती म्हणजे तिच्या मोठया भावामुळे मोठया भावाने लिहिलेल्या शिशीर या अंकामध्ये त्याने सोनालीला लेख लिहिण्यास हट्ट धरला तिथूनच तिला लेखनाची आवड निर्माण झाली.
सोनालीच मराठी तसेच इंग्लिश, हिंदी या भाषेवर चांगलं प्रभुत्व होत. तसेच तिने पुढे जाऊन गुजराती, तामिळ, इटालियन भाषा देखील शिकली याचा उपयोग तिने त्या-त्या भाषेतील चित्रपटनमध्ये काम करण्यासाठी केला. अशी हि मराठमोळी अदाकार पहिल्यांदा दिसली ती ‘चेलू’ चित्रपटात, तिथून आपल्या अभिनयाला सोनालीने सुरुवात केली.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षण मुद्यावर कंगनाचे मोठे विधान
- कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आज होणार ऑनलाईन मेळावे
- देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही- भागवत
- फडणवीस कोरोनातून लवकर बरे व्हावेत, त्यांना शुभेच्छा : एकनाथ खडसे
- राष्ट्रवादीने विश्वासात न घेतल्यास ‘या’ निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा !


