Share

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात होणार कोरोनाची चाचणी मोफत

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेतर्फे २ नोव्हेंबरपासून २४४ ठिकाणी मोफत कोविडविषयक वैद्यकीय चाचणी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे करोना चाचणी करण्याची सुविधा पालिका क्षेत्रात ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध होईल.

पालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये अशा एकूण २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.दरम्यान,सुरुवातीला दररोज सकाळी 10 ते 12 या कालावधीदरम्यान या 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा ‘वॉक इन’ पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

कालपासून 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणीची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिक महापालिकेच्या हेल्पलाईनवर किंवा 1916 या क्रमांकावर संपर्क साधावा.मुंबईत आतापर्यंत केवळ 54 ठिकाणी कोरोनाची चाचणी केली जात होती. मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणारे येणारे विविध दवाखाने, रुग्णालयांसह एकूण 244 ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यामुळे मोफत कोरोना चाचणीच्या ठिकाणींची संख्या वाढून जवळपास 300 होणार आहे.

या 244 ठिकाणांची माहिती http://stopcoronavirus.mcgm.gov.in या वेबसाईटवरुन आणि विभागीय हेल्पलाईनद्वारे किंवा 1926 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोविडची लक्षणे असल्यास वरील क्रमांकावर संपर्क साधून मुंबईकरांना आपल्या घराजवळच मोफत कोरोना चाचणी करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!