पुणे : राज्यातील पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर पहिल्यांदा अशी निवडणूक होत आहे. सरकारमधील घटक पक्ष असलेले हे भाजपच्या विरोधात एकत्र उमेदवार देणार की स्वतंत्रपणे लढणार, याची उत्सुकता असणार आहे.
औरंगाबाद, नागपूर आणि पुणे पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे शिक्षक मतदार संघ यासाठी ही निवडणूक होईल. राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे विधानपरिषदेत भाजपचं वजन वाढलं आहे.
दरम्यान,आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असल्याने पुन्हा समीकरण बदललं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.पदवीधरमधील तीनपैकी दोन जागा या सध्या भाजपकडे आहेत. त्या भाजप राखणार का, याचेही औत्सुक्य असणार आहे.
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठी निवडणुक घोषित करण्यात आल्या आहेत. या ५ ही जागांसाठी ५ नोव्हेंबर रोजी नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे.तर १२ नोव्हेंबर ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे.१७ नोव्हेंबर पर्यंन्त फॉर्म मागे घेता येतील तर या जागांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे.निकाल ३ डिसेंबर रोजी घोषित केला जाणार आहे.
औरंगाबाद, नागपूर आणि पुणे असे ३ पदवीधर मतदार संघ तर अमरावती आणि पुणे २ शिक्षक मतदार संघ यासाठी ही निवडणूक होईल.आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर हि पहिलीच लोकसहभाग असलेली ही निवडणूक असल्याने महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. भाजपने देखील या निवडणुकीची जय्यत तयारी केली असल्याने हि निवडणूक चुरशीची होईल अशी शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत आणि उत्पन्नात सातत्याने होतेय भरघोस वाढ
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

