पुणे : कालचा संपूर्ण दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील अतिशय महत्वाचा दिवस ठरला आहे. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षाकाळ अचानक पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे संतापाचा बांध फुटल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी काल दिवसभर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते.
असंख्य विद्यार्थ्यांनी काल दिवसभर सरकारच्या विरोधातील त्यांचा असलेला रोष दाखवून दिलेला होता. बऱ्याच गोंधळानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली होती.
याबाबत आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रकणात राज्य सरकारची विशेष अशी काही भूमिका नसल्याचे सांगितले आहे. MPSC च्या परीक्षेत राजकारण आणायचे काही कारण नाही. MPSC ही स्वायत्त संस्था आहे. MPSC ने प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते परंतु MPSC परीक्षेबाबत निर्णय घेण्यात कमी पडली असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अंतिम आहे आणि त्यांच्या निर्णयाला आमचे समर्थन आहे. ज्यांना राजकारण करायचे आहे ते नको त्या मागण्या करतील असा टोला विरोधकांना लगावला आहे. MPSC ने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. परंतु राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याच्या नात्याने विद्यार्थ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘हे एवढं दुबळं सरकार आहे की राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत’
- विराट अनुष्काचा सोशलवर रोमँटिक अंदाज
- पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !


