Share

‘हे एवढं दुबळं सरकार आहे की राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत’

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

याआधी एप्रिल, सप्टेंबर २०२० मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील नवी पेठ येथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको करून आंदोलन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

या गोंधळानंतर, आपत्ती निवारण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देखील दिले होते. ‘माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल,’ असं ते म्हणाले होते.

विजय वडेट्टीवार यांच्या स्पष्टीकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे असे मंत्री वडेट्टीवार म्हणतात याचा अर्थ राज्यातले सचिव आपल्या मंत्र्यांनादेखील जुमानत नाहीत एवढं हे दुबळं सरकार आहे असाच होतो… हे राज्य कोण चालवत आहे? महाविकासआघाडी की सचिव मंडळी?’ असा घणाघात भातखळकरांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!