पुणे: राज्य सरकारने १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली. त्यांनतर हे प्रकरण लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आता ही परीक्षा २१ मार्च रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर सरकारला इशारा देत म्हणाले, २१ तारखेला परीक्षा झाली नाही, तर वर्षासमोर उपोषण करू. विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी, त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली.
हे सरकार अतिशय बेजबाबदार असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तारीख जाहीर केली नाही, म्हणून आंदोलन सुरू ठेवले. पण पोलिसांनी विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपले, असा आरोप पडळकर यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- वनमंत्री पदावर काम करण्यासाठी हरिभाऊ राठोड यांचे उद्धव ठाकरेंना पत्र
- विराट अनुष्काचा सोशलवर रोमँटिक अंदाज
- पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी !
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- मोठी बातमी : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र ‘हे’ कडक निर्बंध लागू होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

