🕒 1 min read
औरंगाबाद : बनावट क्रमांकाची दुचाकी घेऊन पैठण रोडवरील कांचनवाडी शिवारातील धुत बंगल्यासमोर उभ्या असलेल्या तरुणाला गुन्हे शाखा पोलिसांनी पकडले. मुक्तेश्वर हरिश्चंद्र म्हस्के (३५, रा. नारायणगाव, ता. पैठण) असे गुन्हे शाखा पोलिसांनी पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई ११ जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.
शहरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकातील जमादार शेख हबीब, विजय निकम आणि राजेंद्र साळुंके हे गुन्हेगारांचा शोध घेत होते. कांचनवाडी शिवारातील धुत बंगल्यासमोर दुपारी मुक्तेश्वर म्हस्के हा बनावट क्रमांक असलेली दुचाकी घेऊन उभा होता.
संशयावरुन पोलिसांनी त्याची चौकशी केली. तसेच त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने दुचाकीचा मुळ क्रमांक खोडून त्याऐवजी बनावट क्रमांक टाकल्याची कबुली दिली. त्यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सातारा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र साळुंके यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
