Share

धक्कादायक ! राज्यात नव्या कोरोनाचे रुग्ण; राजेश टोपेंची माहिती

Published On: 

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे. वेगाने पसरणारा कोरोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत आहे. भारतात दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला होता . मात्र आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच.

गेले काही दिवस राज्यात या नव्या कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने दिलासादायक वातावरण होतं. मात्र, आता राज्यात या नव्या प्रकारच्या कोरोनाचे तब्बल ८ प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्याची माहिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे ही चिंतेची बाब आहे. लशींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली असली तरी कोरोनाचा हा नवा प्रकार अतिशय घटक असल्याचं ब्रिटनमधील हाहाकारातून लक्षात येत आहे.

‘ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!