Share

…म्हणून ‘त्या’ सात बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ

Published On: 

चंद्रपूर – जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींवर आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात घडली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना असून यामुळे जातपंचायतीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

काल या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला मात्र काही तासातच गेल्या 15 वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला.

गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची…पदरी 7 मुली आणि 2 मुलं..त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न ,कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आर्थिक दंड लावला, मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला. मात्र या परिस्थितीपुढे न झुकता ओगले यांच्या मुलींनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला.

या घटनेने पुरोगामी महाराष्ट्रात जात पंचायत आजही किती निर्णायक आहे, हे सिद्ध झाले आहे.  या व्यवस्थे विरोधात कोणीही उघड वा दबक्या आवाजात विरोध केल्यावर त्यांना बहिष्कृत केले जाते. ओगले कुटुंबावर ओढवलेला प्रसंग दुर्दैवी असून गोंधळी समाजाच्या जात पंचायतीच्या चाप बसणे गरजेचे असल्याचे मत खुद्द समाजातून पुढे आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!