Share

मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीकेची झोड उठवली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता राज्य सरकार आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे सोपवण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ आज मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला दिल्लीला गेले आहे.

दरम्यान, अत्यंत महत्त्वाच्या अशा या भेटीच्या आधी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीच्या चर्चेला दुजोरा दिला. मराठा आरक्षणासोबत राज्याशी संबंधित अन्य मुद्द्यांवरही पवार व ठाकरे यांच्यात चर्चा झाली.

सोमवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उद्धव ठाकरे मोदींची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल,” असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!