Share

मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका

Published On: 

नवी दिल्ली- येत्या 21 जूनपासून पेंद्र सरकारकडून सर्व राज्यांना मोफत लस पुरवठा केला जाणार आहे. यामुळे 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना विनामूल्य लस मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली आहे. आता केंद्र सरकारच लसीकरण मोहीम राबवणार आहे.

1 मेला 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचं काम राज्यांवर 25 टक्के सोपवलं होतं. राज्यांनी आपल्या परीने काम केलं पण हे काम करत असताना किती अडचणी येतात हे लक्षात आहे. एकीकडे कोरोनाची दुसरी लाट आणि लोकांकडून लशी मागणी वाढली आहे. अशात मोफत लस मिळण्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यांवरील जबाबदारी ही आता केंद्राकडेच असणार आहे.

देशात उत्पादन होणाऱ्या लसींच्या एकूण साठ्यापैकी 25 टक्के साठा खाजगी रुग्णालयांना खरेदी करता येणार आहे. तसेच निर्धारित किमतीपेक्षा फक्त 125 रुपये खासगी रुग्णालयांना अतिरिक्त आकारता येणार आहेत. त्यापेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.

मोदींच्या या निर्णयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली असून फार आधीच त्यांनी हा निर्णय घेतला असता तर अनेक जीव वाचले असते असं म्हटलं आहे. राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार महिने लागले असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

“फेब्रुवारी महिन्यात आणि त्यानंतरही अनेकदा मी मोदींना पत्र लिहून सर्वांना मोफत लस देण्याची प्रलंबित मागणी मांडली होती. यासाठी त्यांना चार महिने लागले आणि ते देखील दबाव आल्यानंतर…अखेर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं असून आम्ही कित्येक दिवसांपासून करत असलेल्या मागणीची अमलबजावणी होत आहे,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!